Elec-widget

राजन खान यांच्या कार्यालयात घुसून 'हलाल'च्या पोस्टर्सवर शाईफेक

राजन खान यांच्या कार्यालयात घुसून 'हलाल'च्या पोस्टर्सवर शाईफेक

अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयाच्या 2 ते 3 फलकांना मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडलीये.

  • Share this:

25 सप्टेंबर : साहित्यिक राजन खान यांच्या पुण्यातील अक्षर मानव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयात घुसून 2 ते 3 फलकांना मुस्लिम संघटनेच्या  कार्यकर्त्यांनी काळे फासल्याची घटना घडलीये.

खान यांच्या हलाला कथेवरून तयार करण्यात आलेला हलाल सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. त्यामुळे भावना दुखावल्याचं सांगत अवामी विकास पार्टीच्या 4 कार्यकर्त्यांनी खान यांच्या कार्यालयात येऊन फलकांना काळं फासलं. यावेळी खान कार्यालयात हजर नव्हते.  हलाल सिनेमाच्या पत्रकावर काळी शाई ओतून ते पत्रक कार्यालयात ठेवून कार्यकर्ते निघून गेले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...