महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंनी केलं पहिलं ट्विट; हुतात्म्यांना केलं अभिवादन

आपल्या ट्विटमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्यांना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी सहा वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विट केलंय..

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: May 1, 2018 08:15 AM IST

महाराष्ट्र दिनी  राज ठाकरेंनी केलं पहिलं ट्विट;   हुतात्म्यांना केलं अभिवादन

01 मे:   फेसबुक नंतर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल  ट्विटरवर एन्ट्री केली. पण असं असले तरी त्यांनी पहिलं ट्विट आज 59व्या महाराष्ट्र दिनी केलं आहे.

आपल्या ट्विटमध्ये संयुक्त  महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्यांना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी सहा वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विट केलंय.. हे राज्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबदारी जाणण्याचा दिवस, जय महाराष्ट्र..

 

राज ठाकरेंचं ट्विट 

 

Loading...

सोशल मीडियावर राजकीय पक्षांची मांदियाळी पाहता हो  नाही म्हणत राज ठाकरे यांनी मागील वर्षी फेसबुक पेजच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचं ठरवलं आणि राज ठाकरे यांच्या नावे फेसबुक पेज सुरू करण्यात आले. या पेजवर त्यांचा सभा लाईव्ह दाखवल्या जातात. तसंच राज ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रही पोस्ट केली जातात. अल्वधीतच या पेजला तुफान प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या पेजवर सात लाख 84 हजार लाईक मिळाले आहे. 

आता टि्वटर सारख्या मायक्रो सोशल मीडियावरही राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेलं टि्वटर अकाऊंट व्हेरिफाईड म्हणूनच सुरू झाले आहे. अद्याप राज ठाकरे यांनी कोणतेही टि्वट केले नाही पण हजारांच्यावर फाॅलोअर्सची भर पडली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मनसे अधिकृत या नावाने मनसेचं टि्वटर अकाऊंट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 08:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...