राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर;वसईत होणार पहिलं भाषण

वसईच्या ऐतिहासिक नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: May 1, 2018 07:27 AM IST

राज ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर;वसईत होणार पहिलं भाषण

01 मे : आजपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या राज्य दौऱ्याला सुरूवात होणार आहे. आज राज ठाकरे यांची पहिली रॅली वसईमध्ये होणार आहे.

वसईच्या ऐतिहासिक नरवीर चिमाजी आप्पा मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेमध्ये वसईतील भूमाफीयांच्या अतिक्रमणावर राज ठाकरे बोलण्याची शक्यता आहे. वसईतील भूमाफीया आणि चाळमाफीयांविरोधात मनसेनं याआधीही आवाज उठवला होता. तसचं यावेळी राज ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारचाही चांगलाच समाचार घेण्याची शक्यता आहे..

वसईमधील राजावली वाघराळ पाडा येथील वन आणि महसूल खात्याच्या जागेवर भुमाफियांनी अतिक्रमण करून झोपड्या उभारल्या आहेत. आणि यामुळे स्थानिक गरीब लोक फसवले जाताहेत याविरोधात मनसेनं मार्च महिन्यात तब्बल 15 दिवस तहसीलदार कार्यालयामधे ठिय्या आंदोलनही केलं होतं. ज्यानंतर तहसीलदारांनी कारवाई करत नवीन चाळींच्या बांधकामाला काही काळ स्थगिती दिली होती. खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशीच्या रॅलीत राज ठाकरेंनी या परप्रांतिय चाळमाफियांच्या अतिक्रमणावर चांगलीच आगपाखड केली होती.त्यानंतर राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा स्वीकारत मुलुंडमधेही घणाघात केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 07:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close