S M L

इथे आमचंच कुंपण शेत खातंय- राज ठाकरेंचा नाना पाटेकरांना टोला

रंगशारदामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात राज ठाकरे फेरीवाल्यांबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईतील राजकारण तापलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 4, 2017 09:08 PM IST

इथे आमचंच कुंपण शेत खातंय- राज ठाकरेंचा नाना पाटेकरांना टोला

मुंबई,04 नोव्हेंबर:   इथे आमचं कुंपण शेत खातंयअशा शब्दात राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांवर टीका केली. ते मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

फेरीवाल्यांना विरोध करणं चुकीचं असल्याचं वक्तव्य  नाना पाटेकरांनी केलं होतं. यावर राज ठाकरेंनी सडकून टीका केली. नाना चोमडेपणा का करतो  अशा शब्दात त्यांनी नाना पाटेकरांवर टीका केली.रंगशारदामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात राज ठाकरे फेरीवाल्यांबद्दल काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.  फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून सध्या मुंबईतील राजकारण तापलंय.

यावेळी दक्षिणेतले कलाकार जसं राज्यासाठी भांडतात तसं आमचे कलाकार कधी भांडतील असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. मुंबईवर मराठी फेरीवाल्यांचा अधिकार पहिला असंही राज ठाकरेंनी सांगितलं.राज ठाकरेंनी उच्च न्यायालयाचं अभिनंदनही केलं. फेरीवाल्यांना परवानगी असलेल्या ठिकाणीच व्यवसाय करता येईल असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला होता.यापुढे फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्यांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची केस टाकीन असं  ठाकरेंनी ठणकावलंही.अनधिकृत फेरीवाल्यांना हटवायची जबाबदारी पोलिसांची असल्याचंही त्यांनी सांगितलं. मराठी माता-भगिंनीनी अनधिकृत फेरीवाल्यांकडून भाजीपाला घेऊ नये असं आव्हानही राज ठाकरेंनी केलं.

तसंच आपल्या भाषणात राज ठाकरेंनी परप्रांतीयांवर टीकाही केली. अल्लाऊद्दीन खिलजी राज्यावर आला तेव्हा आपल्याला कल्पनाही नव्हती. पण इथलं सारं लुटून तो चालला गेला.इथल्या राजाची कन्याही घेऊन गेला असं सूचक विधानही त्यांनी केलं.  परप्रांतींयांच्या लढ्यासाठी शिवाजी महाराजांचंही उदाहरण त्यांनी दिलं. जे आपल्या राज्यासाठी लढतात त्यांचंच नाव इतिहास लक्षात ठेवतो असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

त्यामुळे आपली परप्रांतीय विरोधी भूमीका यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केली. आता यापुढे राज्यात राजकारण काय वळण घेणं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 08:21 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close