राज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे

अवनी वाघिणीवरून सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. शिवाय २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्राचा वाघ फडणवीस आणि उद्धव यांची काय अवस्था होणार यावर कुंचल्यातून भाष्य केलं आहे ते पाहा..

News18 Lokmat | Updated On: Nov 13, 2018 06:00 PM IST

राज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे

अवनी वाघिणीवरून सध्या सुरू असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी फडणवीस सरकारला व्यंगचित्रातून फटकारे मारले आहेत. शिवाय २०१९च्या निवडणुकीत महाराष्ट्राचा वाघ फडणवीस आणि उद्धव यांची काय अवस्था करणार आहे, यावर कुंचल्यातून भाष्य केलं आहे.-

राज ठाकरेंनी धनोत्रयीदशीपासून दिवाळी व्यंगचित्राची मालिका सुरू केली होती. सर्व सणांच्या दिवशी एकेक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. भाऊबीजेचं व्यंगचित्र पुन्हा एकदा मोदी सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नसल्याची टीका करणारं आहे. भारतमाता पंतप्रधानांची बहीण दाखवली आहे आणि त्यांच्या २०१४पासूनच्या आश्वासनांची आठवण करून देते आहे. भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रुसली आहे आणि गेल्या वेळी ओवाळलं आता मात्र नाही, असं म्हणतेय.

राज यांनी धनत्रोयदशीच्या दिवशी फेसबुक आणि ट्विटरवर पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध केलं. या व्यंगचित्रात देश अतिदक्षता विभागात असल्याचं धन्वंतरी जनतेला सांगत आहे. पहिल्याच व्यंगचित्रातून राज यांनी सरकारवर निशाणा साधत देशावर कर असलेल्या अत्याचाराचा मुद्दा मांडला.

Loading...

धनोत्रयीदशीपासून सुरु केलेली व्यंगचित्राची मालिका सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली. त्यानंतर नरक चतुर्थीलाही केंद्र सरकारवर भाष्य करणारं व्यंगचित्र काढलं. यात कारीटला अमित शहा यांचा चेहरा करण्यात आलं. भाजपला पडलेलं पहाटेचं स्वप्न असा उल्लेख त्यांनी व्यंगचित्रात केला आहे.

अमित शहांच्या व्यंगचित्रानंतर राज्य सरकारवर भाष्य करणार तिसरं व्यंगचित्र काढण्यात आलं. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अभ्यंगस्नान करण्यासाठी बसलेले असताना एक व्यक्ती त्यांच्या कानात संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला धुवायला आला असल्याचे कुजबूजताना दाखवण्याक आलं आहे.

राज ठाकरेंकडून शेअर करण्यात आलेल्या या व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर देवी लक्ष्मी हात जोडून उभी असल्याचे दाखवले आहे. देवी लक्ष्मी या तिघांकडे पाहून बाबांनो गेल्या साडेचार वर्षांत जनतेसमोर फेकलेले हजारो, लाखो कोटींचे आकडे ऐकून मीही थक्क झाले आहे, असे म्हणताना दाखविण्यात आले आहे.

नुकतंच राज यांनी त्यांचं पाचवं व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केलं. पाडव्याच्या निमित्तानं काढलेल्या या व्यंगचित्रात सध्याचे युती सरकार राज्यातील शेतकऱ्याला ओवाळण्यासाठी आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्यांच्या कानात, ‘ओवाळणीत एक दमडी जरी टाकलीत तर याद राखा, ’ असं बजावताना दिसत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देऊन त्यांचा फायदा उठवत असल्याचे राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून दाखवले आहे.

यापूर्वीही राज ठाकरे यांनी मोदी शहा जोडीवर व्यंगचित्राचे फटकारे मारले होते. त्याची आठवण देणारी आणखी काही चित्रं...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2018 05:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...