26 ऑक्टोबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण - डोंबिवलीच्या दौऱ्यावर जात आहेत. आपल्या 3 दिवसांच्या दौऱ्यात ते पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्त्यांशीही चर्चा करणार आहेत.
कल्याण डोंबिवलीतील मान्यवरांशी ते संवाद साधणार आहेत. मुंबई महापालिकेतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. उद्या संध्याकाळी ते डोंबिवली जिमखाना येथे येतील. तर शुक्रवारी सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली विधानसभा, कल्याण ग्रामीण विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नंतर मनसेच्या नगरसेवकांशी ते संवाद साधणार आहेत. तर संध्याकाळी ते शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांशी चर्चा करणार आहेत. तर शनिवारी 28 तारखेला सकाळी ते कल्याणात जाणार असून कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व विधानसभेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
सध्या अनेक विविध मुद्द्यांवर मनसेने घेतलेला वेग आणि पकड पाहता राज ठाकरे यांच्या कल्याण डोंबिवली भेटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा