S M L
Football World Cup 2018

साहित्यिकांनो महाराष्ट्रासाठी भूमिका घ्या!- राज ठाकरेंचे आवाहन

ते सांगलीत भरलेल्या औदुंबर साहित्य संमेलनात बोलत होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Jan 14, 2018 05:43 PM IST

साहित्यिकांनो महाराष्ट्रासाठी भूमिका घ्या!- राज ठाकरेंचे आवाहन

सांगली,14 जानेवारी:   आज महाराष्ट्रातील साहित्यिकांनी महाराष्ट्र आणि मराठीसाठी भूमिका घेणं गरजेचं आहे  असं प्रतिपादन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे.  ते सांगलीत भरलेल्या औदुंबर साहित्य संमेलनात बोलत होते.

आपल्या भाषणात राज ठाकरेंनी  मराठीसाठी भूमिका घेण्याची गरज आहे या मुद्द्यावर भर दिला. तसंच मराठी माणसाला मुंबईचं महत्त्व कळलंच नाही असं ते म्हणाले. मराठी भाषा टिकण्यासाठी आपण चर्चा करतो पण आधी मुंबईत मराठी माणूस टिकला तरच मराठी भाषा टिकेल असंही त्यांनी सांगितलं. मराठीच्या आधी न मागताच गुजरातीलाच  अभिजात दर्जा मिळेल असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला ही लगावला.

देवगिरीच्या यादवांचा पराभव फक्त बेसावधपणे झाला आणि 300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्यात अडकला.तसंच आज आपण बेसावध आहोत. त्यामुळे जातीपातीच्या धर्माच्या भिंती तोडून आज एकत्र येण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी साहित्यिकांचा मोठा वाटा होता. त्यांनी भूमिका घेतली महाराष्ट्र पेटवला म्हणून संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला पण आज महाराष्ट्रातील साहित्यिक भूमिका घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. फक्त साहित्य संमेलन घेऊन, चर्चा करून काहीही होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तसंच भांडण न झालेलं हे पहिलंच साहित्य संमेलन  आहे असं म्हणत साहित्यातील कुरघोडींवरही त्यांनी बोटं ठेवलं.  महाराष्ट्रातील अनेक समस्यांचा पाढाही त्यांनी वाचला

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 14, 2018 05:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close