'नाणार'चा प्रकल्प होऊ देणार नाही, काय करायचं ते करा! - राज ठाकरे

'नाणार'चा प्रकल्प होऊ देणार नाही, काय करायचं ते करा! - राज ठाकरे

कोकणाची वाट लावणारा 'नाणार'चा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

  • Share this:

मुंबई,ता.15 एप्रिल: कोकणाची वाट लावणारा 'नाणार'चा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. हा प्रकल्प गुजरातला जाईल असं मुख्यमंत्री म्हणताहेत, हा प्रकल्प गुजरातला न्या किंवा चंद्रावर न्या आम्हाला देणंघेणं नाही असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही राज ठाकरेंनी कडक टीका केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला जातो आणि भाजपचे नेते आरोपींना पाठीशी घालतात असा आरोप त्यांनी केला. भारत माती की जय म्हणत आरोपींना पाठिशी घालताना यांना लाज कशी वाटत नाही असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राचं वाळवंट होत आहे, असा अहवाल इस्त्रोनं दिला असताना 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्या असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटं सांगताहेत अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईत भाजी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांविरूध्द शिवसेनेच्या नगरसेवकानेच तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2018 09:08 PM IST

ताज्या बातम्या