Elec-widget

काय बोलणार? राज ठाकरे आज पहिल्यांदाच जाणार उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर!

काय बोलणार? राज ठाकरे आज पहिल्यांदाच जाणार उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर भारतीयांच्या मनात मनसेबाबत असलेले गैरसमज दूर होतील, असं कार्यक्रमाच्या संयोजकांचा दावा आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 2 डिसेंबर : राज ठाकरे आज कांदिवलीत उत्तरभारतीयांच्या व्यासपीठावर जाणार आहेत. राज यांचं उत्तर भारतीयांवरचं 'प्रेम' जगजाहीर आहे. मनसेच्या या बदलत्या भूमिकेवर सध्या जोरदार चर्चाही होत आहे. पण सर्व अंदाज दूर सारत राज ठाकरेंनी हे निमंत्रण स्वीकारलंय. त्यामुळे या कार्यक्रमात राज ठाकरे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्षं लागलंय.

पहिले मराठी हा जसा मनसेचा जिव्हाळ्याचा मुद्दा तसाच मुंबईत आदळणारे परप्रांतियांचे लोंढेहाही मनसेचा मुख्य मुद्दा. याच मुद्यांवरून मनसेनं आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुका लढल्या. उत्तरप्रदेश आणि बिहारमधून येणाऱ्या परप्रांतियांच्या लोढ्यांमुळं मुंबई बकाल झाली असा राज यांचा आरोप असतो. आपल्या प्रत्येक भाषणात ते हा विषय लावून धरतात.

याच मुद्यांवरून मनसेनं कायम उत्तर भारतीयांशी 'पंगा' घेतला. फेरीवाल्यांविरूद्ध 'खळ खट्ट्याक' असं खास मनसे स्टाईल आंदोलनही अनेकदा केलं. त्यामुळं मनसे आणि उत्तर भारतीयांमध्ये खास 'प्रेमा'चं नातं निर्माण झालं. पण मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या आता दुर्लक्षित करण्यासारखी राहिलेली नाही.

मनसेचे मुद्दे योग्य असले तरी त्यांची स्टाईल ही चुकीची असल्याची टीका वारंवार होत असते. गेल्या काही निवडणुकीत भूमिपुत्रांचे मुद्दे उपस्थित करूनही पाहिजे तो फायदा निवडणुकीत होत नसल्यानं मनसेतही वेगळा विचार सुरू आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर भारतीयांच्या मनात मनसेबाबत असलेले गैरसमज दूर होतील, असं कार्यक्रमाच्या संयोजकांचा दावा आहे. तर आगामी निवडणुकांमध्ये हिंदी भाषिकांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असा एक मतप्रवाह मनसेत आहे. कदाचित त्यामुळेच राज ठाकरेंनी हे उत्तर भारतीयांचं निमंत्रण स्वीकारल्याचं बोललं जातंय.

Loading...

राज ठाकरे आणि हिंदी भाषिकांच्या वाढत्या जवळकीबद्दल मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम बोलले नसते तरच नवल. रेल्वे भर्ती आंदोलनादरम्यान, उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणी बद्दल राज ठाकरे यांनी पहिले माफी मागावी, नंतरच हिंदी भाषिकांज्या स्टेजवर यावं अशी मागणीही त्यांनी केलीय.

मनसेच्या या बदलत्या भमिकेबद्दलही काही प्रश्न उत्तर भारतीय समाजातून उपस्थित झालेत करण्यात येत आहेत.

असे आहेत प्रश्न...

1. मुंबईत आजवर मनसे कार्यकर्त्यांकडून उत्तर भारतीयांना झालेल्या मारहाणीबद्दल राज ठाकरे माफी मागणार का ?

2. मुंबईत सर्वच जाती धर्माचे फेरीवाले धंदे लावतात, मग फक्त उत्तर भारतीयांनाच का टार्गेट केलं जातं ?

3. मनसेकडून उत्तर भारतीयांवर होणारे हल्ले यापुढे तरी थांबणार का ?

4. राज ठाकरे यापुढे तरी उत्तर भारतीयांना टार्गेट करणं थांबवणार का ?

5. मुंबईत मनसेकडून यापुढे तरी उत्तर भारतीयांना सन्मानाची वागणूक मिळणार का ?

आजवर फक्त मराठीच्या मुद्यापुरती मर्यादीत राहिलेला राज ठाकरेंचा मनसे पक्ष या कांदिवलीतील कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच उत्तर भाषिकांना आकर्षित करू पाहतोय. पण आजवरचा मनसेचा खळ्ळ खट्याकचा अनुभव पाहता उत्तर भारतीय 'मनसे'च्या या बदलत्या भूमिकेवर खरंच 'दिलसे' विश्वास ठेवणार का, हे आगामी निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.


 


 

VIDEO : दुष्काळाचं दुष्टचक्र : आता या गावात उरली आहेत फक्त वृद्ध मंडळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...