कुठे तलवार भेट तर कुठे औक्षण, नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे PHOTOS

राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2018 04:24 PM IST

कुठे तलवार भेट तर कुठे औक्षण, नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या स्वागताचे PHOTOS

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी नाशिक जिल्ह्यात दाखल झाले आहे. सटाणा, कळवण, बागलाण आणि चांदवड तालुक्यात राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी "राज ठाकरे यांचा विजय असो"या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

  काल मंगळवारी इगतपुरी कोर्टात हजर राहिल्यानंतर त्यांनी इगतपुरी तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.

 आज राज ठाकरे सटाणा,कळवण,बागलाण आणि चांदवड या तालुक्यांचा दौऱ्यावर पोहोचले. यावेळी राज ठाकरे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

Loading...

 राज ठाकरे यांचा ताफा दाखल होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केलं.

 कार्यकर्त्यांनी यावेळी 'राज ठाकरे यांचा विजय असो' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कार्यकर्त्यांनी यावेळी 'राज ठाकरे यांचा विजय असो' या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

 राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

 राज ठाकरे यांनीही गाडीच्या दारात उभं राहुन कार्यकर्त्यांना अभिवादन केलं.

राज ठाकरे यांचा ताफा पोहोचताच कार्यकर्ते आणि गावातील तरुणांनी त्यांच्या गाडीला एकच घेराव घातला होता.

राज यांनीही गाडीच्या दारात उभं राहुन कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं. तेव्हा तरुणांनी मोबाईलमध्ये राज यांचा फोटो कैद केला.

 सटाणा तालुक्यात राज ठाकरेंनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं.

  सटाणा गावात सलग 2 मंदिरात राज ठाकरे दर्शनासाठी गेले होते. यावेळी महिलांनी मंदिरात राज यांचं औक्षणही केलं.

 गावातील शिवरायांच्या पुतळ्याला राज ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना तलवार भेट दिली.

 लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. नाशिक जिल्हा हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता.

 मात्र याच जिल्ह्यात मनसेची मागील निवडणुकीत पिछेहाट झाली. आता राज ठाकरे हे या बैठका आणि दौऱ्यातून मनसेला जुनं वैभव पुन्हा मिळवण्यात यशस्वी होतात का ? या चर्चेनं जोर पकडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2018 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...