S M L

राज ठाकरे-शरद पवारांची मुलाखत 21 फेब्रुवारीला !

मनसेचे अध्य़क्ष राज ठाकरे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची बहुप्रतिक्षित मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2018 08:31 PM IST

राज ठाकरे-शरद पवारांची मुलाखत 21 फेब्रुवारीला !

10 फेब्रुवारी : मनसेचे अध्य़क्ष राज ठाकरे हे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची बहुप्रतिक्षित मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. आता या मुलाखतीचा मुहूर्त अखेर ठरला असून 21 फेब्रुवारीला पुण्यात ही मुलाखत होणार आहे.

पुण्यात जागतिक मराठी अकादमीतर्फे 'शोध मराठी मनाचा'  हे 15वे जागतिक संमेलन जानेवारी महिन्यात संपन्न झाले. या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, तत्कालीन परिस्थितीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली होती. आता शरद पवार यांची ही बहुप्रतिक्षित मुलाखत बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही मुलाखत सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे, अशी माहिती जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली..

मुक्त संवाद....दोन पिढ्यांचा या विशेष संकल्पनेवर आधारित माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची ही मुलाखत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे घेणार आहेत. यातून पन्नास वर्षांचा राजकीय-सामाजिक आणि सांस्कृतिक प्रवास उलगडला जाणारा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 08:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close