S M L
Football World Cup 2018

कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही, राज ठाकरेंचा सल्ला

कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही. तुम्हाला सर्वाना एक राहावं लागेल असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पबाधितांना दिला.

Sachin Salve | Updated On: Jan 13, 2018 08:13 PM IST

कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही, राज ठाकरेंचा सल्ला

13 जानेवारी : कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही. तुम्हाला सर्वाना एक राहावं लागेल असा सल्ला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पबाधितांना दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाणार प्रकल्पबाधितांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. कोकणी माणूस हा सरकारच्या दृष्टीकोनातून खूप सोपा झालाय. त्याला कसं हाताळायचं हे त्यांना जमतं. त्यामुळे  कडवट विरोधाशिवाय प्रकल्प रद्द होणार नाही. तुम्हाला सर्वाना एक राहावं लागेल आणि पैशाने तुमच्यातले विकले गेले तर काही उपयोग नाही असं त्यांनी प्रकल्पबाधितांना सांगितलंय.

रिफानरी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पाबद्दल सांगणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 13, 2018 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close