S M L

आता मोदींना तुमच्या चौकात बोलवा-राज ठाकरे

तसंच मोदी हे परत पंतप्रधान होणार नाहीत असं भाकित देखील राज ठाकरेंनी वर्तवलंय.

Updated On: Aug 31, 2018 03:55 PM IST

आता मोदींना तुमच्या चौकात बोलवा-राज ठाकरे

बीड, 31 आॅगस्ट : नोटबंदीचा निर्णय फसला तर चौकात फाशी द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणातून म्हटलं होतं. आता प्रत्येक भारतीयानं मोदींना पत्र पाठवून आमच्या चौकात या असं पत्र पाठवा अशी उपरोधक टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. आज बीडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिझर्व्ह बँकेच्या नोटाबंदीसंदर्भातील अहवालावरून मोदींवर जोरदार टीका केली जातेय. आता राज ठाकरेंनीही मोदींना खोचक टोला लगावलाय. नोटाबंदीच्या वेळी मोदी नी भाषणातून सांगितले होते की याचा सकारात्मक परिणाम झाला नाही तर चौकात शिक्षा द्या त्याप्रमाणे आता प्रत्येक भारतीयांनी मोदींना पत्र पाठवून आमच्या चौकात या असं कळवावं अशी टीका ठाकरे यांनी केली. तसंच नेपाळमध्ये थापा असल्यामुळे मोदी तिथं गेले असल्याचा टोलाही लगावला.

येणाऱ्या डिसेंबरमध्ये तीन राज्याच्या निवडणुकीतील पराभवास तोंड देण्याची शक्यता असल्याने भाजप एकत्रित निवडणुकीचा घाट घालत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. तसंच मोदी हे परत पंतप्रधान होणार नाहीत असं भाकित देखील राज ठाकरेंनी वर्तवलंय.दरम्यान, काल गुरुवारीही औरंगाबाद दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मी नोटबंदी नंतर चुकीचा निर्णय म्हणून पहिल्यांदा बोललो आता ते सगळे सत्य समोर आलंय. केवळ एका माणसाच्या हट्ट पायी सगळी नुकसान झाले अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 03:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close