सस्पेन्स संपवणार, राज ठाकरे जाहीर करू शकतात विधानसभेची रणनीती

राज ठाकरे पक्षाच्या पुढच्या राजकारणाची दिशा जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 04:15 PM IST

सस्पेन्स संपवणार, राज ठाकरे जाहीर करू शकतात विधानसभेची रणनीती

मुंबई, 2 ऑगस्ट : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 ऑगस्टला मनसेचा महामेळावा होणार आहे. या महामेळाव्यात राज ठाकरे पक्षाच्या पुढच्या राजकारणाची दिशा जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेकडून सध्या या मेळाव्याची जोरदार तयार सुरू आहे.

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र अद्यापपर्यंत राज ठाकरे यांच्या मनसेनं आपला कोणताही मोठा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. त्यामुळे 5 ऑगस्टला होणाऱ्या महामेळाव्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका जाहीर करतात, याबाबत मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

विधानसभा निवडणुका आणि राजकीय पक्षांच्या रणनीती

शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्णपणे सक्रीय करून शिवसेनेनं नवी खेळी खेळली आहे. आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेद्वारे महाराष्ट्रभर फिरून लोकांशी संवाद साधत आहेत.

Loading...

भाजपची महाजनादेश यात्रा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभा निवडणुकीकरता अवघं राज्य पिंजून काढणार आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी ते 'महाजनादेश यात्रे'च्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघात जाणार असून सरकारची कामं जनतेसमोर ठेवणार आहेत.

राष्ट्रवादीही प्रत्युत्तर देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढणार आहे. येत्या 6 ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर प्रारंभ होणार आहे.

VIDEO: भीषण दुर्घटना, मेंढ्या वाचवण्याच्या नादात 3 कारचा अपघात त्यानंतर ट्रकची धडक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 04:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...