PHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे

पक्षबांधणीसाठी डोंबिवलीत आलेल्या राज ठाकरेंचं एक वेगळं रूप कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Dec 16, 2018 07:05 AM IST

PHOTOS : अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना भावूक झाले राज ठाकरे

अनेक वर्षांपासून दुरावलेले राज ठाकरे यांचे लाडके ग्रेट डेन श्वान जेम्स आणि बाँड यांचं पिल्लू असलेल्या रॅम्बोची भेट राज ठाकरेंनी आज डोंबिवली दौऱ्यादरम्यान घेतली.

काही अपरिहार्य कारणास्तव राज ठाकरे यांनी या दोन श्वानांना त्यांच्या फार्महाऊसवर पाठवलं होतं. त्यामुळे अनेक वर्षांपासून त्यांची भेटही झाली नव्हती.

Loading...

मात्र, आज डोंबिवलीत आले असताना मनसे कार्यकर्ते राजू पाटील यांच्या घरी त्या दोघांचं पिल्लू असलेल्या रॅम्बो या ग्रेट डेनची त्यांनी आवर्जून भेट घेतली.

अनेक वर्षानंतर रॅम्बोला भेटताना राज ठाकरे भावूक झाले होते. यावेळी त्यांनी रॅम्बोला जवळ घेत त्याचे लाड केले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे राजकारणी म्हणून नव्हे तर एक श्वानप्रेमी म्हणून चांगले सर्वश्रूत आहे. त्यांच्या घरीच अनेक वेगळ्या ब्रिडचे श्वानं आहे.

विरोधकांवर तुटून पडणाऱ्या राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वातला हा हळवा कप्पा पाहून बघणारे स्तब्ध झाले. डोबिंवलीत त्याच श्वानप्रेमाचं आगळवेगळं रुप दिसून आलं.

राज ठाकरे आणि रॅम्बो यांच्यातील जिव्हाळ्यामागे कारणही तसंच खास आहे.

राज ठाकरेंच्या लाडक्या जेम्स आणि बाँडचं हे पिल्लू तर आहेच...मात्र वर्षभरापूर्वी मृत्यू पावलेल्या बाँड आणि रॅम्बोमध्ये खूपच साम्य आहे.

त्यामुळेच रॅम्बोला पाहिल्यानंतर राज ठाकरेंच्या बाँडसोबतच्या आठवणी दाटून आल्या.

ग्रेटडेन जातीचे जेम्स आणि बाँड राज ठाकरेंचे अतिशय लाडके होते.

मात्र 2015 मध्ये बाँड राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिलांच्या चेहऱ्याला चावल्यानं खळबळ उडाली. यानंतर बाँड, जेम्स आणि शॉन या तिन्ही ग्रेटडेन श्वानांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली.

राज ठाकरेंनी भेट दिलेला रॅम्बो हा बाँड आणि जेम्स यांचं पिल्लू आहे.

रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही साजरे होतात.

त्यामुळे राज ठाकरे या एका माणसाच्या मागे एक कणखर राजकारणी, एक हरहुन्नरी कलाकार आणि एक हळवा श्वानप्रेमी असे अनेक चेहरे आहेत याचं दर्शन पुन्हा एकदा जगाला झालंय.

राज ठाकरे जेव्हा निघाले होते तेव्हा त्यांनी लाडक्या रॅम्बोला लाडाने टाटाही केला आणि रॅम्बोनेही मान हलवून जणू टाटा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2018 07:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...