News18 Lokmat

लोकसभा निवडणूक : राज ठाकरे 9 मार्चला जाहीर करणार भूमिका

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेची निवडणुकीबाबतची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 09:24 AM IST

लोकसभा निवडणूक : राज ठाकरे 9 मार्चला जाहीर करणार भूमिका

मुंबई, 5 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 13 वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (9 मार्च)होणार आहे. या सोहळ्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत कुणासोबत जाणार याबाबतची भूमिका जाहीर करतील, अशी माहिती आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. पण राज ठाकरे यांच्या मनसेची निवडणुकीबाबतची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे कार्यकर्त्यांसमोर आपली अंतिम भूमिका जाहीर करतील. तसंच राज आपल्या भाषणात दहशतवादी हल्ल्यावरून मोदी सरकारवर तोफ डागण्याचीही शक्यता आहे

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती. पण अजूनही कोणताही निर्णय समोर आला नसून मनसेत अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे, शिवसेना आणि भाजपने युतीची घोषणा केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीही अंतिम टप्प्यात आहे. अशातच लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून मात्र अजूनही कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

भाजप-सेना युतीची घोषणा

Loading...

नाही नाही म्हणता म्हणता अखेर भाजप आणि शिवसेना मिळून लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकी एकत्र लढणार आहे. लोकसभेसाठी भाजपकडे 25 जागा तर शिवसेनेकडे 23 जागा राहणार आहेत. तर विधानसभेसाठी भाजपकडे 144 तर शिवसेनेकडे 144 जागा असतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली.


Special Report : खोतकरांचं बंड पेल्यातलं वादळ तर ठरणार नाही ना?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 09:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...