सोलापूर, 15 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापुरात जाहीर सभा घेत आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी दिलेल्या वचनांबद्दल नरेंद्र मोदी यांनी बोलावं, मोदींनी जाहीरातींवर 4800 कोटी खर्च केले अशी टीका केली आहे.
राज ठाकरेंचा हल्लाबोल
- नोटीबंदीच्या निर्णयानं 5 ते 6 कोटी नोकऱ्या गेल्या.
- आरक्षण दिलं पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे?.
- 5 वर्षात बाबासाहेब आंबेडकांचं स्मारक का नाही झालं?.
- स्मारकाची कल्पना माझी, स्मारक म्हणून जगातील सर्वात मोठी लायब्ररी उभी करा.
- मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाचं काय झालं?.
- भाजपकडे दाखवण्यासारकं काही नाही.
- मोदींनी जाहीरातीवर 4800 कोटी खर्च केले.
- पाच वर्षात दाखवलेल्या स्वप्नांबद्दल बोला.
- दिलेल्या वचनांबद्दल नरेंद्र मोदी यांनी बोलावं.
- माझ्या सभांच्या खर्चाची भाजपला चिंता.
- मोदी देशाशी धादांत खोटे बोलले.
- सरकारच्या लेखी तुमची काहीही कमी नाही.
- मुख्यमंत्र्यांनी माझा दावा खोडून दाखवावा.
- 1 लाख 20 हजार विहीरी बांधलात मग, दुष्काळ कसा?
- सरकार जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय.
- आत्तापर्यंत निर्लज्ज पंतप्रधान पाहिला नाही.
- रशियाच्या वाटेवर देशाला नेण्याचं अमित शहा, नरेंद्र मोदींचा प्रयत्न.
- भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पत्रकार लिहू शकणार नाहीत.
- नरेंद्र मोदी, अमित शहा देशाच्या राजकीय क्षितीजावरून नाहीसे झाले पाहिजेत.
- मोदींना मदत होईल अशा कुणालाही मतदान करू नका.
- पुढील सभांमधून सर्व गोष्टी मांडणार.
- भाजपनं जो कहर केला आहे. त्याचा तुम्हाला अंदाज नाही.
- भाजपनं पैसे वाटल्यास घ्या. यांना रिकामं करा.
- भाजपनं केसानं गळा कापला.
- उद्योगपतींचं कर्ज माफ होतं.
- भाजपनं उद्योगपतीचं अडीच लाख कोटींचं कर्ज माफ केलं.
- निवडणुकांसाठी जवानांचा वापर करणार का?
- पुलवामा हल्ल्यातील आरडीएक्स आलं कुठून? याचं उत्तर नरेंद्र मोदी देणार का?
VIDEO : काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा, हे पाहून नवनीत राणांना कोसळलं रडू
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा