S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

राज ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर

नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज सुनावणीसाठी स्वत: कोर्टात हजर होते. अॅड सयाजी नागरे, अॅड शिरोडकर यांनी राज ठाकरेंच्या जामीनासाठी अर्ज सादर केला होता.

Updated On: Dec 18, 2018 12:49 PM IST

राज ठाकरे यांना अखेर जामीन मंजूर

नाशिक, 18 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना इगतपुरी कोर्टाने अखेर जामीन मंजूर केला आहे. परप्रांतीयांना मारहाण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर 2008 साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जामीन मिळाल्याने राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेले राज ठाकरे आज सुनावणीसाठी स्वत: कोर्टात हजर होते. अॅड सयाजी नागरे, अॅड शिरोडकर यांनी राज ठाकरेंच्या जामीनासाठी अर्ज सादर केला होता.

सुनावणीनंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया


'एकाच गुन्ह्यासाठी माझ्यावर 92 केसेस आहेत. यातील 65 केसेस महाराष्ट्रातच आहेत. एका गुन्ह्यासाठी एकच केस का नाही ? जरा साहेबांना विचारून घ्या की,' असं सुनावणीनंतर बार असोसिएशनच्या वकिलांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले.

...म्हणून राज ठाकरे 'रॅम्बो'ला भेटले, तुम्ही ऐकाल तर मन हेलावून जाईल!

राज ठाकरेंचा नाशिक दौरा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. ते 22 डिसेंबरपर्यंत नाशिक शहरासह जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. अलिकडे मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपविरोधात आलेले निकाल आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात राज ठाकरे जिल्हा पिंजून काढणार असल्याची माहिती आहे.


VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 12:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close