राम मंदिराच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी भाजप आणि उद्धव ठाकरेंना फटकारलं!

राम मंदिराच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी भाजप आणि उद्धव ठाकरेंना फटकारलं!

तुम्हीच आधीच देश खड्ड्यात घातलाय. आता माझ्या नावाने गळे काढत आहात. लोकांनी तुम्हाला रामराज्य मागितलं होतं, राम मंदिर नाही.

  • Share this:

मुंबई, ता. 25 नोव्हेंबर : राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजपने वातावरण तापवलं असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून उद्धव ठाकरे, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर निशाना साधलाय. लोकांनी तुम्हाला रामराज्य मागितलं होतं राम मंदिर नाही असं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून स्पष्ट केलं.


बाळासाहेबांच्या तालमित तयार झालेले राज ठाकरे अनेक घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करतात ते आपल्या व्यंगचित्रांमधून. रविवारीही त्यांनी बोलकं व्यंगचित्र काढून उद्धव ठाकरे यांच्यासह भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर जोरदार फटकारे ओढले.


व्यंगचित्रात राम आणि लक्ष्मण दाखवले असून ते भाजप विहिंप आणि उद्धव ठाकरेंना सांगत आहेत की तुम्हीच आधीच देश खड्ड्यात घातलाय. आता माझ्या नावाने गळे काढत आहात. लोकांनी तुम्हाला रामराज्य मागितलं होतं, राम मंदिर नाही.


रविवारी दिवसभर उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौऱ्या आणि सरसंघचालकांची उपस्थिती असलेली विहिंपची हुंकार रॅली चांगलीच गाजली. निवडणुका जवळ आल्याने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळं शिवसेना आणि भाजपने या मुद्याला हात घातलाय. तीच संधी साधत राज ठाकरेंनी दोघांवरही निशाना साधलाय.

अयोध्येतील उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद पाहा 'UNCUT'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2018 09:27 PM IST

ताज्या बातम्या