News18 Lokmat

शहिदांचे फोटो लावून भाषण करताना लाज वाटत नाही? - राज ठाकरे

मी अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि उमेदवार उभा केला नाही. कारण मला अमित शाह आणि मोदींना सत्तेतून बाहेर काढयचं आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 08:25 PM IST

शहिदांचे फोटो लावून भाषण करताना लाज वाटत नाही? - राज ठाकरे

नांदेड, 12 एप्रिल : लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नांदेडमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघात केला. तर त्यांच्या भाषणातून आणि वेगवेगळे पुरावे सादर करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

मी इथे कोणाचाही प्रचार करण्यासाठी आलो नाही. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा मला राग आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मी सभा घेत असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत. मी अत्यंत जाणीवपूर्वक निर्णय घेतला आणि उमेदवार उभा केला नाही. कारण मला अमित शाह आणि मोदींना सत्तेतून बाहेर काढयचं आहे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

भाषणातील राज ठाकरे यांचे महत्त्वाचे मुद्दे

- या देशातील तरुणांना खोटी स्वप्न दाखवली गेली

- पंतप्रधान झाल्यानंतर वेगळेच मोदी पाहायला मिळाले

Loading...

- आजकाल मोदींच्या सभेला काळे कपडे घालणा-याला सभेला यायला देत नाही. मग हे कसले पंतप्रधान

- मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्द आणि तरुणांबद्दल मोदी काहीच बोलले नाही

- जवानांच्या नावावर मोदी मत मागतायत

- 5 वर्षांपूर्वीचे नरेंद्र मोदी आता राहिले नाहीत

- प्रधानसेवक हा शब्दप्रयोग नेहरुंचा आहे

- मोदी आणि अमित शहांविरोधात मी प्रचार करणारच

- देशानं बहुमत दिलं पण तुम्ही खोट बोलत राहिले

- विकासकामं नाहीत त्यामुळे पाकचा बागुलबुवा करतायत

- पुलवाम्यात आरडीक्स आलं कसं? राज ठाकरेंचा मोदींना सवाल

- फक्त घोषणा नकोत, विचारही करा - मोदींना सल्ला

- बाहेरच्या राज्यातील लोक महाराष्ट्रातील जनतेच्या नोकऱ्या घेत आहेत.

- या पुढचं आयुष्य तुम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे गुलाम बनून राहायचं आहे का?

- देशात  2 माणसांकडून गळचेपी

- हुकुमशाहीच्या दिशेने देशाची वाटचाल

- दुर्देवाने ही माणसं निवडणून आली तर तुम्हाला आयुष्यात काही करता येणार नाही

- मुख्ममंत्रीदेखील खोटं बोलतात

- गोदावरीचं पाणी गुजरातला वळवण्यासाठी काम सुरू

- बसवलेला मुख्यमंत्री कधीच काही बोलणार नाही

- बीडमध्ये महिलांची गर्भाशय काढून विकतायत

- हा चौकीदार करतो काय

- शहीदांचे फोटो लावून भाषण करताना लाज वाटत नाही?


...आणि कांचन कुल यांना आमदारसाहेबांनी घेतलं उचलून, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 08:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...