S M L

धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात,शेवटी काय झालं ?-राज ठाकरे

प्रत्येक समुदायाच्या वेगळ्या इमारती, सोसायटी झाल्या तर मग भारत या संकल्पनेचं काय होणार?

Updated On: Aug 22, 2018 11:39 PM IST

धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात,शेवटी काय झालं ?-राज ठाकरे

पुणे, 22 आॅगस्ट : धोनी धोनी प्रमाणे मोदी मोदी ओरडलात, घोषणा दिल्या. पण मोदींनी पहिली कुऱ्हाड व्यापाऱ्यांवरच मारली ना असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या जैन बांधव संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

पुण्यात जैन बांधव संवाद मेळाव्यात राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्यांवरून वेगवेगळ्या गटांना कानपिचक्या दिल्यात. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. जैन लोकांच्या वेगळ्या सोसायट्या नकोत, अशाने देश विभक्त होतो असंही ठाकरे म्हणाले.

काही दिवसांपूर्वी जैन मुली भाजपचा प्रचार करत असल्याची क्लिप व्हॉटस्अॅपवर पाहिली. पण तुम्ही मुनी आहात ना मग पक्षाचा प्रचार कशा करतात. हा जाब तुम्ही विचारला पाहिजे असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.दांडिया आम्हीही खेळतो म्हणत नाही. पण गुजराती आहे म्हणून मोदी अमेरिकेत गेले ओबामांना भेटल्यावर विचारलं केम छो.तुम्हाला आवडलं असेल. पण मला नाही आवडलं

राम राम म्हटलं तरी आवडलं नसतं.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कधी सत श्री अकाल म्हटलं का ?, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, कुण्या एका राज्याचे किंवा धर्माचे नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.

प्रत्येक समुदायाच्या वेगळ्या इमारती, सोसायटी झाल्या तर मग भारत या संकल्पनेचं काय होणार? असा मार्मिक सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला.

Loading...

---------------------------------------------------------------------------

PHOTOS : नवी दुचाकी, सेल्फी आणि एका कुटुंबाचा करूण अंत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 11:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close