शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे 'जमिनी'वर !

हे पाहताच राज ठाकरे सुद्धा खुर्चीवरून उतरून खाली बसले आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 10, 2017 10:13 PM IST

शेतकऱ्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे 'जमिनी'वर !

10 नोव्हेंबर : आपला रोखठोक स्वभाव आणि थोड्याश्या लहरीपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं एक वेगळं रुप आज नाशिककरांना पाहायला मिळालं.

समृद्धी महामार्गाला विरोध असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांची भेट घेतली. मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते राज यांना भेटण्यासाठी आले होते. खोलीत मोठी गर्दी झाली.. मग शेतकऱ्यांनी खुर्चा बाजूला सारून खाली बसणं पसंत केलं.

हे पाहताच राज ठाकरे सुद्धा खुर्चीवरून उतरून खाली बसले आणि शेतकऱ्यांची व्यथा आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. राज यांनी अशा प्रकारे जमिनीवर बसून गप्पा मारणं उपस्थितांसाठी सुखद धक्का होता. यामुळे राज यांचं एक वेगळं रुप पहायला मिळालं.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात शिवडे गावातल्या शेतकऱ्यांनी बागायती जमीन द्यायला विरोध केलाय. संघर्ष समितीचे राजू देसले यांनी  बाजू मांडली. आमच्यावर अन्याय करून चुकीच्या पद्धतीनं जमीन अधिग्रहण सरकार करतंय असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यात लक्ष देणार असल्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2017 10:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...