पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कमी होणार; वेधशाळेचा अंदाज

पुढील चार ते पाच दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कमी होणार आहे. पण, कोकणात मात्र पाऊसाची जोरदार बॅटींग राहिल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 05:29 PM IST

पुढील चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर कमी होणार; वेधशाळेचा अंदाज

मुंबई, 15 जुलै- पुढील चार ते पाच दिवसांत राज्यभरात पावसाचा जोर कमी होणार आहे. पण, कोकणात मात्र पाऊसाची जोरदार बॅटींग राहिल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 18 जुलैनंतर विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पालघर, पुणे, मुंबईत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाजही कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे.

पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर नाही, कोकणात काही भागात राहील पाऊस, महाराष्ट्राच्या इतर भागात मात्र अद्याप वाट पाहवी लागेल. चार-पाच दिवसनंतर विदर्भ, मराठवाडा भागात मात्र पाऊस येण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.

पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आतापर्यत कोकणात सरासरीपेक्षा जास्त तर मध्य महाराष्ट्रात सरासरी पेक्षा साधारण पाऊस झाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा सर्वच जिल्ह्यात कमी पाऊस झाला. पालघर, पुणे, मुंबई येथे सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला. नाशिक, ठाणे, रायगड, सातारा आणि कोल्हापूर येथे सरासरी इतका पाऊस झाला. उत्तर महाराष्ट्रातही आतापर्यत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, परभणी, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा गोंदियात जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. 18 जुलैल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा होईल. त्यानंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही भागात चांगला पाऊस होईल. मात्र, त्यासाठी पुढील चार-पाच दिवस वाट पाहावी लागेल, असे कुलाबा वेधशाळेने म्हटले आहे.

VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...