मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस

ढगांच्या गडगडाटासह, विजेच्या लखलखाटासह पावसाच पुनरागमन झालंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2017 12:58 PM IST

मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस

25 जून : मुंबईसह महाराष्ट्रात संततधार पाऊसाला दमदार सुरुवात झालीय. ढगांच्या गडगडाटासह, विजेच्या लखलखाटासह पावसाचं पुनरागमन झालंय.मुंबईमध्ये सतत होत असलेल्या पावसामुळे ,आता पाणी साचण्यास सुरुवात झालीय. काही ठिकाणी मुंबईत स्लो लोकल फास्ट ट्रॅकवर वळवल्या गेल्या आहेत.रेल्वे वाहतूकही ठप्प झालीय.आज विशेष मेगा ब्लॉक असून मध्य रेल्वेची वाहतूक 6 तास बंद राहणार आहे.

भिंवडी ,पालघर ,ठाणे ,कोकण सर्वच भागात जोरदार पाऊसाला सुरुवात झालीय. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये ही सकाळपासून पाऊस पडतोय . अनेक ठिकाणी कम्पाउंड वॉल्स तर काही ठिकाणी झाडंही पडलीत. कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी जनजीवन विस्कळीत झालंय.

याशिवाय कोल्हापूर,मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही पावसानं दमदार हजेरी लावलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2017 11:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...