News18 Lokmat

रखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक!

गेल्या 14 दिवसांपासून रखडलेल्या पावसाला अखेर पुन्हा एकदा सुरूवात झालीय. रखडलेल्या मोसमी पावसाला कालपासून चांगली सुरूवात झाल्याचं दिसून येतंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2018 09:17 AM IST

रखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक!

मुंबई, 24 जून : गेल्या 14 दिवसांपासून रखडलेल्या पावसाला अखेर पुन्हा एकदा सुरूवात झालीय. रखडलेल्या मोसमी पावसाला कालपासून चांगली सुरूवात झाल्याचं दिसून येतंय. सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टीसह गुजरातच्या वलसाड आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव , विदर्भातही पाऊस पोहोचलाय. तर मोसमी पावसाच्या सक्रियतेमुळं कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही चांगल्या पावसाला सुरूवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालाय. दरम्यान आजही सर्वदूर पावसाच्या शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

परभणी जिल्ह्यात तब्बल 12 दिवसांच्या खंडानंतर काल रात्री जोरदार पाऊस झालाय जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झालाय सर्वाधिक पावसाची नोंद ही पूर्णा तालुक्यात झालीय पूर्णेत तब्बल 52.80 मीमी पाऊस झाल्याने थुना नदीला पूर आलाय. या पुरामुळे आहेरवाडी, वडगाव या 2 गावांचा संपर्क तुटलाय. पुराचं पाणी नदीशेजारच्या शेतांमध्येही शिरले आहे. या पावसामुळे पेरणीच्या कामांना गती मिळणार आहे.

दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज कोल्हापूर शहरात दमदार पावसाने हजेरी लावली.गुरूवारी सकाळपासून कोल्हापूरमध्ये पाऊस पडला नव्हता, त्यामुळे तापमानातही वाढ झाली होती पण आज सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर शहरातल्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. आज सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता होती त्यातच ग्रामीण भागातही पेरण्या पूर्ण झाल्यामुळ बळीराजा पावसाची वाट बघत होता आणि आज सकाळी शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झालाय.

औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या भरून वाहत होत्या. सारोळा येथील सत्तार सरदार पठाण आणि सचिन माकवन  नाचनवेल कडून सारोळा कडे जात असताना अंजना नदीचे पुरात वाहून गेले त्यापैकी सत्तार यास ग्रामस्थांनी वाचविले. मात्र सचिन माकवन हा प्रवाहात वाहून गेला. ग्रामस्थांनी सकाळी शोधले असता त्याचा मृतदेह आज सकाळी सापडला. घटना कन्नड तालुक्यातील आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 24, 2018 09:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...