उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा..सुटीच्या दिवशी बाहेर पडलेल्यांची पंचाईत

मुंबई, पुण्यासह राज्यभरातील नागरिक उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, रविवारी राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईकर मात्र अद्याप पावसाच्या प्रतिक्षतेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 07:33 PM IST

उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा..सुटीच्या दिवशी बाहेर पडलेल्यांची पंचाईत

मुंबई, 9 जून- मुंबई, पुण्यासह राज्यभरातील नागरिक उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, रविवारी राज्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुंबईकर मात्र अद्याप पावसाच्या प्रतिक्षतेत आहे.

सुटीच्या दिवशी बाहेर पडलेल्यांची पंचाईत..

पुण्यात नेमका संध्याकाळी आलेल्या मुसळधार पावसामुळे सुटीच्या दिवशी बाहेर पडलेल्यांची पंचाईत झाली. जोरदार पावसामुळे अलका टॉकीज चौक, पूना हॉस्पिटल चौक, गांजवे चौक, लाल बहादूर शास्त्री रस्त्या तसेच गरवारे कॉलेजमागील रस्त्यावर भरपूर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे.आपटे रस्त्यावरही पाणी साचले आहे. तसेच शहरात अनेक भागात पाणी साचल्याचे वृत्त आहे.त्यातच पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी वीज गायब झाल्याने भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याचा आनंद लुटणाऱ्यांच्या आनंदावर अक्षरशः पाणी पडले आहे.

आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्याला झोडपले..

गेल्या चार दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. मात्र, आंबेगाव, शिरुर, खेड तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली. अचानक सुरु झालेल्या पाऊसाने वातावरण गारवा निर्माण झाल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Loading...

उत्तर पुणे जिल्ह्यात दुष्काळी संकटामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. अशात चार दिवसांपासून पाऊसाची चाहुल लागली आहे. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी आकाशाकडे पाऊसाची वाट पहात असताना वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सध्या लगीन सराई जोरात सुरु असून आंबेगाव शिरुर खेड तालुक्यात अचानक सुरु झालेल्या पाऊसाने लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.

भंडारा शहरात बरसला पाऊस

भंडारा शहरात पाऊस बरसला. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर रविवारी भंडारा शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. 15 मिनिटे आलेल्या पावसामुळे भंडारा वासियांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. या मोसमातील हा पहिला पाऊस असल्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या सर्वाना आनंद झाला आहे.

रत्नागिरी,खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-मंडणगड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. मान्सून पूर्व पावसाने शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी टंचाईग्रस्त गावाला या पावसाचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, पाणीटंचाईनं ग्रासलेल्या माणदेशात मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार आगमन. शिखरशिंगणापूर शेजारच्या मोही गावातल्या चारा छावणी परिसरात पाणी साचेपर्यंत पाऊस पडला. पावसानं माणदेशातली जनता सुखावली.

वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी...

मावळ तालुक्‍यात वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मे महिन्याच्या तापलेल्या उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना जोरदार पडलेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. अचानक पडलेल्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे देहू बाजारपेठेत व्यापारीवर्ग शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. घरावर टाकलेले कागद व ताडपत्री उडाले. तब्बल दीड तास कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. पावसामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांचा वेगही कमी झाल्याने महामार्गावर वाहने संथ गतीने पुढे सरकत आहेत.

संगमनेर तालुक्यात जोरदार पाऊस...

धांदरफळ परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

बारामती शहर व परिसरात वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. या पावसामुळे शहर व परिसरात गारवा निर्माण झाला आहे.


VIDEO : जन्मावेळी उपस्थित असलेली नर्स भेटताच भावुक झाले राहुल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...