मुंबईसह अनेक शहरांत पावसाची हजेरी, अंगावर वीज पडून 3 जणांचा मृत्यू

विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात...

News18 Lokmat | Updated On: Apr 14, 2019 09:23 PM IST

मुंबईसह अनेक शहरांत पावसाची हजेरी, अंगावर वीज पडून 3 जणांचा मृत्यू

मुंबई, 14 एप्रिल : मुंबईच्या अनेक भागांत पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांचा चांगलाच गोंधळ उडाला आहे. शनिवारीदेखील मुंबईच्या काही भागांमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस पडला.

धुळे शहरासह जिल्ह्यात ढगांचा गडगडतासह विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. रिमझिम पावसासह सोसाट्याचा वारा वाहतो आहे. अचानक वातावरण बदलल्याने बाजारपेठेत नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

अंगावर वीज पडून तीन जणांचा मृत्यू

दिंडोरी तालुक्यातील मानोरी इथे अवकाळी पावसामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावर वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. अनिल गवे वय 32, सागर गवे वय 17 आणि रोहित गायकवाड वय 18 असं या मायतांची नावं आहेत. तर याचा गावात गोठ्यावर वीज पडून एका गायीचा देखील मृत्यू झाला आहे.

मनमाड, येवला, लासलगाव, चांदवड भागात आज  पावसाची पुन्हा हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी दमदार  पाऊस झाला. पावसामुळे कांदा भिजला तर वादळी वाऱ्याने द्राक्षे आणि डाळिंब बागांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

Loading...

विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात...

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळं आणि शनिवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंब्यांचं नुकसान झालं आहे. एका झाडाचे किमान 100 ते 150 आंबे खाली पडले आहेत.


VIDEO: आणि म्हणून मोदींऐवजी बारामतीत अमित शहा घेणार सभा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2019 09:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...