एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाऊस आणि गारपीट

महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असताना कोल्हापूरजवळ मात्र वादळी वारे आणि गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. नेसरी, चंदगड या परिसरात दुपारी चारच्या सुमाराला जोरदार वारे, पावसासह गारपीट झाली.

News18 Lokmat | Updated On: Apr 27, 2019 07:05 PM IST

एकीकडे उन्हाच्या झळा तर दुसरीकडे पाऊस आणि गारपीट

संदीप राजगोळकर

कोल्हापूर, 27 एप्रिल : महाराष्ट्रात सगळीकडेच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असताना कोल्हापूरजवळ मात्र वादळी वारे आणि गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. नेसरी, चंदगड या परिसरात दुपारी चारच्या सुमाराला जोरदार वारे, पावसासह गारपीट झाली.

उन्हाच्या झळांमध्ये थोडा दिलासा

गेल्या दोन आठवड्यांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचं तापमान वाढलं होतं. कोल्हापूरमध्येही 40 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलं होतं. या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला.

कोल्हापूरजवळच्या अनेक गावांमध्ये आठवडी बाजार होते. तिथे मात्र पावसामुळे नुकसान झालं. शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला.

Loading...

कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण

कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं. शेतीच्या मशागतीसाठी हा पाऊस पोषक असला तरी या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळित झालं.

गारपिटीचा तडाखा

एकीकडे गेल्या दशकभरातलं सगळ्यात जास्त तापमान आहे तर दुसरीकडे वादळी वारे आणि गारपीट असं चित्र आहे. दक्षिण भारतातल्या काही राज्यांत वादळाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पाँडिचेरी या भागात जोरदार वादळ आणि पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमानवाढ आणि हवामान बदलाचा परिणाम सगळीकडेच पाहायला मिळतो आहे.

विदर्भात मात्र उष्णतेची लाट

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे. निम्म्यापेक्षा जास्त विदर्भात 45 अंश तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. मागील सहा दिवसांत तापमान 39 अंशांवरून 45 अंशांपेक्षा जास्त झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिस्थीतीमुळे विदर्भ चांगलाच होरपळला आहे. जगातील सर्वात उष्ण अशा पंधरा शहरांपैकी सहा शहरे विदर्भातील आहे.

अकोल्यात सर्वाधिक तापमान

अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 46.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जगातील 15 सर्वात उष्ण शहरांत विदर्भातील 6 शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे, राज्यातही उष्णतेची लाट तीव्र झाल्याने कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पारा 40 अंशांवर पोहोचला आहे.

============================================================================

VIDEO : भरसभेत नितीन गडकरींना आली भोवळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2019 07:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...