अहमदनगरमध्ये रेल्वे मार्ग खचला, मोटरमनला ट्रेन थांबवण्यात यश

काम पूर्ण झाल्यावर इथं पहिली रेल्वे धावली आणि पहिल्याच रेल्वेचं इंजिन पुलावर गेलं आणि हा पूल खचला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 12, 2018 08:41 AM IST

अहमदनगरमध्ये रेल्वे मार्ग खचला, मोटरमनला ट्रेन थांबवण्यात यश

12 जानेवारी : अहमदनगरच्या नगर दौंडमध्ये गेट नंबर 14 वरचा पूल खचला . यामुळे 9 तास रेल्वे सेवा बंद झाली होती. या पुलाचं काम जमिनीखालून करण्यात आलं होतं. काम पूर्ण झाल्यावर इथं पहिली रेल्वे धावली आणि पहिल्याच रेल्वेचं इंजिन पुलावर गेलं आणि हा पूल खचला. पण मोटरमनच्या प्रसंगवधाननं रेल्वे थोडक्यात थांबवण्यात आली. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण रेल्वे पुल खचल्यामुळे बराच वेळ रेल्वे सेवा विस्कळीत होती.

रेल्वेमार्ग खचल्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले. तर 5 गाड्या रेल्वे स्थानकांवरच उभ्या करण्यात आल्या होत्या. तब्बल 8 तास रेल्वे सेवा विस्थळीत झाली होती. त्यामुळे प्रवासी यात चांगलेच खोळंबले होते.

रेल्वे काम करुन रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी पहिली गाडी सोडण्यात आली. आणि आता रेल्वे सेवा सुरुळीत चालू आहे. पण या अपघातामुळे प्रवाशांना त्यांच्या गावी पोहचण्याच उशिर झालां.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 12, 2018 08:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...