वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा 'रेलरोको'

वाशिंद रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा 'रेलरोको'

तीन दिवसांपूर्वी या मार्गावर दुरांतोचे काही डबे रूळाखाली घसरले होते. तेव्हापासून या मार्गावरील मुंबईकडे येणारा अप मार्ग बंद करण्यात आला होता.

  • Share this:

वाशिंद, 01 सप्टेंबर: ३ दिवसांपासून वाशिंद-आसनगाव लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. वाशिंदपर्यंत लोकलसेवा सुरू करावी अशी मागणी करत प्रवाशांनी रेलरोको केला आहे.

तीन दिवसांपूर्वी या मार्गावर दुरांतोचे काही डबे रूळाखाली घसरले होते. तेव्हापासून या मार्गावरील मुंबईकडे येणारा अप मार्ग बंद करण्यात आला होता. या मार्गावर मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अजूनही सुरू झालेली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्या मात्र डाऊन मार्गावरून दोन्ही दिशेने चालवल्या जात आहेत. मुंबईकडे जाणारी लोकलसेवा बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आहे. अप मार्गाच्या ट्रॅकचं काम पूर्ण न झाल्यामुळे ही लोकलसेवा बंद ठेवल्याचं सांगण्यात येतं आहे.

दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटं उशीराने चालू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 09:16 AM IST

ताज्या बातम्या