दापोली अपघात- ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले, २५ तासांनी बचावकार्य पूर्ण

मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2018 12:20 PM IST

दापोली अपघात- ३० मृतदेह बाहेर काढण्यात आले, २५ तासांनी बचावकार्य पूर्ण

दापोली, २९ जुलैः दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसचा पोलादपूर ते महाबळेश्वरदरम्यान आंबेनळी घाटात कोसळून अपघात झाला. या अपघातात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातातील ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, हे मदतकार्य पूर्ण झाले आहे. घटनास्थळी ट्रेकसर्स आणि एनडीआरएफच्या मदतीने दरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या बसमधल्या प्रवाशांपैकी सहाय्यक कृषी अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांनी या दरीतून वर येऊन अपघाताची माहिती दिली. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो, अशी माहिती प्रकाश यांनी दिली.

या अपघाताची माहिती मिळताच सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ५०० फट खोल दरीत उतरण्यासाठी गिर्यारोहकांची मदत घेण्यात आली. एका मोठ्या क्रेनच्या मदतीने मृतदेह वर काढण्यात आले. अपघातानंतर घाटात बघ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. तसेच वाहतूक कोंडीही मोठय़ा प्रमाणात झाली. याचा मदतकार्यावर परिणाम होऊ नये म्हणून महाबळेश्वर- पोलादपूर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. यापुढे अशाप्रकारचे अपघात होऊ नयेत यासाठी अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात येणार आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे (‘एनडीआरएफ’) बचाव पथक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाले नव्हते. ट्रेकर्स आणि पोलिसांचे पथक मदतकार्यात गुंतले होते. जीव धोक्यात घालून ट्रेकर्स मदतीसाठी अपघातस्थळी उतरले होते. अत्यंत दुर्गम आणि खडतर असलेल्या या भागात त्यांच्यामुळेच मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले. १०.३० वाजता घटना घडूनही तब्बल सात तासांहून अधिक कालावधी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे पथक का पोहोचू शकले नाहीत याबाबत आश्चर्य आणि चीड व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-

'पोलादपूर बस दुर्घटनेची होणार चौकशी'

Loading...

VIDEO : चिमुकलीने रोखली पावले, म्हणून तो वाचला

PHOTOS : अपघातापूर्वीचे अखेरचे 'ते' बसमधील फोटो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2018 12:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...