नागपुरात उच्चभ्रू महिलांचे 'ते' कृत्य उघड, पोलिसांनी असा केला भंडाफोड

जरीपटका पोलिसांनी या हायप्रोफाइल महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि चार महिलांना अटक केलीय. तर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी झाला. पाहूया राज्याच्या उपराजधानीत उच्चभ्रू महिलांच्या जुगार अड्ड्याचे वास्तव सांगाणारा स्पेशल रिपोर्ट..

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 05:36 PM IST

नागपुरात उच्चभ्रू महिलांचे 'ते' कृत्य उघड, पोलिसांनी असा केला भंडाफोड

प्रवीण मुधोळकर (प्रतिनिधी),

नागपूर- 9 मे- नागपुरात पुरुषांचे जुगार अड्डे हा प्रकार काही नवीन नाही. अशा जुगार अड्ड्यावर पोलीस नेहमीच कारवाई करत असतात. मात्र, नागपुरातील एका वेगळ्या जुगार अड्ड्याची सर्वत्र चर्चा आहे आणि हा जुगार अड्डा आहे उच्चभ्रु महिलांचा.. नुकतीच जरीपटका पोलिसांनी या हायप्रोफाइल महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि चार महिलांना अटक केलीय. तर दोन महिला पळून जाण्यास यशस्वी झाला. पाहूया राज्याच्या उपराजधानीत उच्चभ्रू महिलांच्या जुगार अड्ड्याचे वास्तव सांगाणारा स्पेशल रिपोर्ट..

नागपुरातील जरीपटाका पोलीस स्टेशन हद्दीतील तोटिया चौकातील एका इमारतीत हा जुगार अड्डा सुरु होता. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी छापा टाकला. यात चार महिलांना जुगार खेळताना अटक केली तर दोन महिला खिडकीतून पसार झाल्या. जुगार अड्ड्यावरुन पोलिसांनी 30 हजार रुपयांची रोकड जप्त केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक राहुल वकर यांनी दिली आहे.

आरोपी महिला दयानंद पार्कमध्ये राहतात. रेणू साधवानी, वीणा रिहानी, सीमा सिंधवानी, ज्योती हरजानी  जुगार खेळणाऱ्या या महिलांना सिगरेट, गांजा, हुक्का आणि मद्यसेवन करत होत्या. पती घराबाहेर पडल्यानंतर या महिला या जुगारअड्डा भरवत होत्या.

जरीपटका परिसरातील तोटिया चौकात गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरु होता. या अड्ड्यावर दारू आणि हुक्का सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती आहे. नागपूर पोलीस पुरुषांच्या जुगार अड्ड्यावर नेहमीच छापा टाकतात आणि कारवाई करतात. मात्र, महिलांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचा गेल्या काही वर्षांतला नागपूर पोलीसांचा हा पहिलाच अनुभव आहे. पोलिसांच्या या कारवाईने पॉश इमारतीत अशाप्रकारे जुगार अड्डा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Loading...


दिग्दर्शक अनुराग कश्यप का वैतागले पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...