S M L

पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळालीत तर राष्ट्रवादीला 33 मतं मिळालीत.

Updated On: Aug 4, 2018 02:15 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी

पुणे, 04 आॅगस्ट : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळालीत तर राष्ट्रवादीला 33 मतं मिळालीत. यावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. तर उपमहापौरपदी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांची निवड झालीये.

महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली आहे. आणि आज ते त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.

शेती परवडत नसल्याने दहावी होताच जाधव यांनी पॅगो रिक्षा पाच वर्षे घालवली. नंतर 2006ला मनसेसोबत काम करण्यास सुरूवात केली. 2012ला ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि गेल्यावर्षी ते भाजपकडून निवडूनही आले. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. मात्र, स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आणि आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत.

मावळते महापौर नितीन काळजे आणि नियोजित महापौर राहुल जाधव यांच्यात अनेक साम्य आहेत. हे दोघेही भोसरीच्या आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. दोघेही शेतकरी कुटुंबातील आहेत. दोघांनाही बैलगाडा शर्यतीची आवड आहे. दोघांचे शिक्षणही जवळपास सारखेच. काळजेंचे अकरावी, तर जाधवांचे दहावी झालेली आहे. दोघांचाही प्रभाग भोसरी मतदारसंघात आहे. भोसरीच्या आमदारांना 2014च्या मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडून आणण्यात दोघांचाही मोठा वाटा आहे. दोघेही पालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2018 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close