News18 Lokmat

हे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी

आमच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडली होती.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2018 04:53 PM IST

हे तर संघ आणि भाजपचं मनुवादी राजकारण- राहुल गांधी

जळगाव, 15 जून : काल आमच्या मालकीच्या विहिरीवर पोहायला का गेलात या कारणावरून दोन मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. जामनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडली होती. न्यूज18लोकमतनं त्याची दखल घेऊन याला वाचा फोडली होती. आणि आज त्याची दखल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही घेतलीय. त्यांनी ट्विट करून सरकारवर टीका केलीय. ते म्हणालेत,

महाराष्ट्राच्या या दलित मुलांचा इतकाच अपराध होता की ते एका 'सवर्ण' विहीरीत अांघोळ करत होते. आज माणुसकीही अगदी काड्यांचा शेवटचा आधार घेत आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करतीये. आरएसएस/भाजप च्या मनुवादाच्या विखारी राजकारणाचा आपण विरोध केला नाही तर इतिहास आपल्याला कधीच क्षमा करणार नाही.

या प्रकरणी तब्बल तीन दिवसांनी बुधवारी मध्यरात्री संबंधीत दोन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनमध्ये अँट्रासिटीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना घडणे म्हणजे माणूसकिला काळीमा फासली गेली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

गावातल्या शेतात रविवारी ही मातंग समाजाची दोन मुलं पोहण्यासाठी उतरली होती. ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहीरीवर ते गेले होते. या शुल्लक कारणांवरून ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांनी या दोन मुलांच्या अंगातील कपडे काढून नग्न केले व त्यांना पट्याने जबर मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांची धिंडही काढली.

वाकडी गावातील मराठी शाळेजवळ कर्णफाट्यावर रविवारी सकाळी दहा वाजता घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं शेवटी पोलिसांनी कारवाई केली. आरोपींविरूद्ध कठोर करवाई करावी अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली आहे.

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 01:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...