राहुल गांधींनी एकदा अयोध्येच्या राम मंदिरात जावं-संजय राऊत

राहुल गांधींनी एकदा अयोध्येच्या राम मंदिरात जावं-संजय राऊत

सध्या गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आणि राहुल गांधी प्रचारादरम्यान सोमनाथसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. याचबरोबर, राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये राहुल गांधीचं कौतुक सुरू आहे.

  • Share this:

07 डिसेंबर: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भावी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आवाहन केलंय. राहुल गांधी ज्याप्रमाणे सोमनाथच्या मंदिरात गेले, त्याचप्रमाणे त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिरातही जावं, असं संजय राऊत म्हणालेत.

सध्या गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आणि राहुल गांधी प्रचारादरम्यान सोमनाथसह अनेक मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत.   याचबरोबर, राम मंदिर वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सामनामध्ये राहुल गांधीचं कौतुक सुरू आहे. पण आज अचानक सेनेनं राहुलना हे आवाहन केलंय.

राम मंदिरावर अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू झाली आहे. फेब्रुवारीत नियमित सुनावणी ही सुरू  होणार आहे. त्यामुळे रामजन्मभूमीचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींना अयोध्येत जावून राम मंदिरात पूजा करण्याचं आव्हान दिलंय. राहुल गांधी मतांसाठी गुजरातच्या मंदिरात जातात तर त्यांनी अयोध्येच्या मंदिरातही जावं असं आव्हन संजय राऊत यांनी दिलंय. त्यामुळे आता राहूल गांधी खरंच राम मंदिराच्या राजकारणात उडी घेतात की नाही हे पडणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 09:39 AM IST

ताज्या बातम्या