महाराष्ट्र लोकसभेसाठी काँग्रेसचा प्लान तयार, राहुल गांधी घेणार 2 सभा

महाराष्ट्र लोकसभेसाठी काँग्रेसचा प्लान तयार, राहुल गांधी घेणार 2 सभा

चंद्रपूर काँग्रेस लोकसभा उमेदवार बाळू धाणोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. चंद्रपूर आणि धामणगाव येथे अशा दोन सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 31 मार्च : काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 5 एप्रिलला महाराष्ट्रात येणार आहे. भाजपा केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या मतदार संघात राहुल गांधी सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रपूर काँग्रेस लोकसभा उमेदवार बाळू धाणोरकर यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेणार आहेत. चंद्रपूर आणि धामणगाव येथे अशा दोन सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

धामणगाव येथील सभेने वर्धा आणि अमरावती लोकसभा प्रभाव होईल या विचाराणे राहुल गांधी यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात राहुल गांधी जनतेचा विश्वास जिंकरणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष लोकसभा प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार याची माहिती काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली होती.

काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फुटणारट

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या प्रचाराला आजपासून सुरुवात होणार आहे. या जागेवरील उमेदवाराची काँग्रेसने अद्याप घोषणा केलेली नाही. यावरून काँग्रेसवर टीकाही होत आहे. अशातच आता काँग्रेस रविवारी संध्याकाळी 4 वाजता आपल्या प्रचाराला सुरुवात करणार आहे. त्यामुळे प्रचाराला सुरुवात होण्याआधी पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून अनेक नावं चर्चेत आहे. यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अरविंद शिंदे, मोहन जोशी, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर या नावांवर काँग्रेस विचार करत आहे. परंतु या सगळ्यांमध्ये प्रवीण गायकवाड यांचं नाव आघाडीवर असल्याचं कळतं आहे. कारण शनिवारी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवीण गायकवाड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.


VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:51 AM IST

ताज्या बातम्या