News18 Lokmat

राहुल फटांगळे हत्येप्रकरणी 3 जणांना अटक

या प्रकरणी अखेर 3 आरोपींना अटक करण्यात आलीये. या तिन्ही आरोपींनी राहुल फटांगळेच्या खुनाची कबुली दिली आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2018 07:21 PM IST

राहुल फटांगळे हत्येप्रकरणी 3 जणांना अटक

10 जानेवारी : भिमा कोरेगाव हिंसाचारामध्ये राहुल फटांगळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अखेर 3 आरोपींना अटक करण्यात आलीये. या तिन्ही आरोपींनी राहुल फटांगळेच्या खुनाची कबुली दिली आहे. सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

1 जानेवारी 2018 रोजी भिमा कोरेगाव इथं दोन गटामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे दंगल उसळली होती. या दंगलीत समाजकंटकांनी वाहनांची नासधुस केली. या धुमश्चक्रीत राहुल फटांगळे याचा तरुणाचा मृत्यू झाला. अखेर 10 दिवसानंतर या प्रकरणी अहमदनगरमधून 3 जणांना अटक कऱण्यात आलीये. तिन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिलीये. त्यांच्याविरोधात शिक्रापुर पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वी कलम 302, 143, 148, 149,म.पो.का. 37,1,135 गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस व्हिडिओ क्लिप, सीसीटीव्ही फुटेज,मोबाईल काॅल रेकाॅर्ड डेटा याचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2018 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...