कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडे खून प्रकरणातील संशयितांचे फोटो प्रसिद्ध

फोटोतल्या व्यक्तींची माहिती असेल तर सीआयडीला संपर्क करण्याचं आवाहन सीआयडीनं केलंय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2018 12:55 PM IST

कोरेगाव भीमा दंगल : राहुल फटांगडे खून प्रकरणातील संशयितांचे फोटो प्रसिद्ध

08 जून : कोरेगाव भीमा हिंसाचारातल्या राहुल फटांगडे खून प्रकरणातील संशयितांचे फोटो सीआयडीनं प्रसिद्ध केलेत. फोटोतल्या व्यक्तींची माहिती असेल तर सीआयडीला संपर्क करण्याचं आवाहन सीआयडीनं केलंय.

1 जानेवारी 2018 रोजी  कोरेगाव भीमा इथं दोन गटामध्ये वाद निर्माण झाल्यामुळे दंगल उसळली होती. या दंगलीत समाजकंटकांनी वाहनांची नासधुस केली. या धुमश्चक्रीत राहुल फटांगळे याचा तरुणाचा मृत्यू झाला होता.

राहुल फटांगळे

राहुल फटांगडे

कालच  पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात झालेल्या अटकसत्राबद्दल माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. यावेळी बोलताना कदम म्हणाले, 'एल्गार परिषदेच्या आयोजनात माओवाद्यांचा सहभाग स्पष्ट आहे. आरोपींचे माओवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत संबंध आहेत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2018 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...