नाव 'स्वाभिमानी' आणि उद्योग बेईमानी - रघुनाथदादा पाटील

नाव 'स्वाभिमानी' आणि उद्योग बेईमानी - रघुनाथदादा पाटील

शेट्टी आणि खोत यांच्यात फक्त वाटणीसाठी भांडणं सुरू असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलीय.

  • Share this:

22 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून सदाभाऊ खोत यांनी बाहेर पडावं असा सल्ला दिलाय शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी. शेट्टी आणि खोत यांच्यात फक्त वाटणीसाठी भांडणं सुरू असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलीय. तसंच नाव स्वाभिमानी आणि उद्योग बेईमानी असल्याचा घणाघातही त्यांनी खासदार राजू शेट्टींवर केलाय.

त्यामुळे शेट्टी खोत वादात आता रघुनाथदादा पाटील यांनीही उडी घेतलीय. आज कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कार्यरत असलेल्या सुकाणु समितीच्या वतीनं शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलीय.

तसंच आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला नक्की नमवू असा इशाराही या परिषदेच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये देण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2017 05:58 PM IST

ताज्या बातम्या