Elec-widget

राजू शेट्टी हे तर विदूषक,रघुनाथदादांचा घणाघात

राजू शेट्टी हे तर विदूषक,रघुनाथदादांचा घणाघात

"राजू शेट्टी हे खासदार आहेत त्यांच्याकडे संसदीय आयुध आहे, तसंच ते सत्तेतही सहभागी आहेत मग ते रस्त्यावर का उतरताहेत ?"

  • Share this:

28 एप्रिल : विरोधी पक्षांची संघर्षयात्रा आणि सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेली संवाद यात्रा म्हणजे नौटंकी असून त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे विदूषकाची भूमिका बजावत आहेत अशी खोचक टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलीय.

कोल्हापूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. राजू शेट्टी हे खासदार आहेत त्यांच्याकडे संसदीय आयुध आहे, तसंच ते सत्तेतही सहभागी आहेत मग ते रस्त्यावर का उतरताहेत असा सवाल करत कर्जमाफीवरुन सरकार शेतकऱ्यांचा छळ करत असल्याचंही रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये ऊसाला दर जास्त आहे. त्यामुळे राज्यातल्या ऊस उत्पादकालाही सध्याच्या दरापेक्षा 1 हजार रुपये जादा दर मिळावा अशी मागणी करत ही मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या 10 मे रोजी कोल्हापूरमधल्या साखर सहसंचालक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा रघुनाथदादांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...