S M L

नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र टाकून केली रॅगिंग; अधिकारी मोकाट

नागपूरच्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहून डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पारधी समाजाच्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र विसर्जन करून त्याचं रॅगिंग करण्यात आलं.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 1, 2018 09:30 AM IST

नागपूरच्या वसतिगृहात विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र टाकून केली रॅगिंग; अधिकारी मोकाट

01 मार्च : नागपूरच्या शासकीय वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र टाकून रॅगिंग करण्याचा अतिशय घाणेरडा प्रयत्न करण्यात आला आहे. विषारी बाटलीत मूत्र टाकून ते विद्यार्थ्यांना पाजण्यात येत होतं. नागपूरच्या शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात राहून डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पारधी समाजाच्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर मूत्र विसर्जन करून त्याचं रॅगिंग करण्यात आलं. विष्णू पवार असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर ढेकूण मारण्याच्या औषधाच्या बाटलीत लघुशंका करून तीही त्याला पाजली. विष्णूवर थोडक्यात उपचार झाल्याने त्याचे जीव वाचले आहेत.

अजनी पोलिस ठाण्याच्या शेजारीच असणाऱ्या या वसतीगृहात एका विद्यार्थ्याच्या जीवन-मरणाचा प्रश्‍न उपस्थित झाला असताना अजनी पोलिसांनी प्रचंड हलगर्जी पणा केला उशीरा का होईना या प्रकरणात गुन्हा दाखल केला. या सगळ्या विचित्र आणि गंभीर प्रकारातून आपल्या मुलाचा जीव वाचला यातच विष्णुचे पालक समाधान मानताहेत.

या वसतीगृहाच्या वार्डनकडे विष्णुने अनेकदा रँगिगबद्दल अनेक तक्रारी केल्या. पण रँगिग चुपचाप सहन करायची असा सल्ला वार्डनने दिला होता. या प्रकरणात अद्याप हे वसतीगृह चालवणाऱ्या सामाजिक न्याय खात्याने कुठलीही कारवाई केली नाहीये. पण अशा विचित्र आणि जीवघेण्या प्रकारावर लवकर कारवाई व्हावी अशी विष्णूच्या पालकांची इच्छा आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 09:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close