PHOTOS: असे लावले टी-४९ च्या मादी बछड्यांना 'रेडिओ कॉलर आयडी'

चंद्रपूर जिल्हयात ब्रह्मपुरी वनविभागात वाढत्या वाघांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना 'रेडिओ कॉलर आयडी' लावण्यात आले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2019 05:29 PM IST

PHOTOS: असे लावले टी-४९ च्या मादी बछड्यांना 'रेडिओ कॉलर आयडी'

चंद्रपूर जिल्हयात ब्रह्मपुरी वनविभागात वाढत्या वाघांच्या हल्ल्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांना 'रेडिओ कॉलर आयडी' लावण्यात आले आहेत. त्याचे काही फोटो आमच्या हाती लागले आहेत.

‘पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थालांतरणाचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलर आयडी’ लावण्यात आले आहे.

‘पूर्व विदर्भातील व्याघ्र प्रदेशात वाघांच्या स्थालांतरणाचा अभ्यास’ या संशोधन प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडिओ कॉलर आयडी’ लावण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील ३ छाव्यांना रेडिओ कॉलर आयडी लावण्यात आल्यामुळे ब्रह्मपुरी वनविभागातील वाघांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यास मोठी मदत होणार आहे.

Loading...

या मोहिमेमुळे सदर परिसरात घटना घडल्यास त्या घटनेबाबत ठोस पुरावे मिळविण्यासाठी भविष्यात त्याचा उपयोग होईल.

ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरीमध्ये वास्तव्यास असलेल्या टी - ४९ वाघिणीच्या चार मादी बछड्यांपैकी ई - १ आणि ई - ४ या बछड्यांना कोरेगाव बिटमधील कक्ष क्र. १५७ मध्ये खाडीमुंडा खोदतलाव परिसरात रेडिओ कॉलर आयडी लावण्यात आले आणि त्यांची योग्य तपासणी करून त्यांना निसर्गमुक्त करण्यात आले आहे.

ब्रह्मपुरी वनविभागातील टी - ४९ वाघिणीच्या कब ई - ३ ला त्याच परिसरात रेडीओ कॉलर आयडी लावण्यात आलं. सदर मोहिमेत भारतीय वन्यजीव संस्था देहराडूनचे पशुचिकित्सक डॉ. पराग निगम, डॉ. बिलाल हबीब तसेच पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी चेतन पातोड यांच्या चमुने बेशुद्ध करून रेडिओ कॉलर लावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2019 05:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...