News18 Lokmat

नगरच्या राजकारणात ट्विस्ट, रोहित पवारांनंतर विखेही ठरणार राम शिंदेंसाठी डोकेदुखी?

विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विखेंचीही वर्णी लागली.

News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2019 11:14 AM IST

नगरच्या राजकारणात ट्विस्ट, रोहित पवारांनंतर विखेही ठरणार राम शिंदेंसाठी डोकेदुखी?

अहमदनगर, 20 जून : माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात विखेंचीही वर्णी लागली. आता भाजपकडून विखे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

नगर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सध्या कर्जतमधील भाजप आमदार राम शिंदे यांच्याकडे आहे. परंतु आता या पालकमंत्रिपदासाठी राधाकृष्ण विखे यांच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी काळात राम शिंदे यांच्याकडून हे पद काढून विखेंना देण्याचा विचार भाजपकडून केला जाऊ शकतो.

राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे आगामी विधानसभा निवडणूक राम शिंदे यांच्या कर्जत मतदारसंघातून लढवण्याची शक्यता आहे. आधी विधानसभेत रोहित पवार यांच्या रुपाने तर आता पालकमंत्रिपदासाठी शिंदे यांना विखेंच्या रुपाने नवे स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे राम शिंदेंसमोर सध्या दुहेरी डोकेदुखी निर्माण झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान, नगरच्या पालकमंत्रिपदाबाबत भाजपकडून अद्याप कोणतंही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.

विखेंचा मंत्रिमंडळातील समावेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये एकूण 13 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गृहनिर्माण मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर राधाकृष्ण विखे – पाटील यांना दिलेलं मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सतीश तळेकर यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना राधाकृष्ण विखे – पाटील यांना मंत्रिपद का दिलं? याचं उत्तर सरकारनं द्यावं असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

Loading...


उद्धव ठाकरेंचा पवार कुटुंबियांना टोला, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 11:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...