राणे नाराज असतील तर आमच्याशी बोलावं -विखे पाटील

राणे नाराज असतील तर आमच्याशी बोलावं -विखे पाटील

"नारायण राणे यांच्या गणपतीला कुणी गेलं म्हणजे राणेंचा भाजपचा प्रवेश झाला असं काही होत नाही"

  • Share this:

01 सप्टेंबर :  नारायण राणे यांच्या गणपतीला कुणी गेलं म्हणजे राणेंचा भाजपचा प्रवेश झाला असं काही होत नाही असं मतविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व्यक्त केलं, तसंच राणे नाराज असतील तर त्यांनी आमच्याशी बोलावं जाहीर माध्यमांमध्ये बोलू नये असा सल्लाही विखे पाटील यांनी दिलाय.

नारायण राणे भाजपमध्ये जाणार नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर आता काँग्रेसमधून राणेंवर टीका होऊ लागलीये. राधाकृष्ण विखे पाटील यांना नारायण राणेंना सबुरीचा सल्ला दिलाय. राणेंनी कधीही आपली नाराजी आपल्याकडे बोलून दाखवली नाही. ते नाराज असल्याचं माध्यमातूनच समजतं असा खुलासाही विखेंनी केला. कोणी त्यांच्या गणपतीच्या दर्शनाला गेलं म्हणून ते भाजप सोडून जातील असं नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

नारायण राणे काँग्रेसमध्येच आहेत ते कुठंही जाणार नाहीत असा विश्वासही  विखे पाटील यांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 1, 2017 07:45 PM IST

ताज्या बातम्या