Elec-widget

राधाकृष्ण विखे – पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात विधिमंडळ नेतेपदी

राधाकृष्ण विखे – पाटील यांचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात विधिमंडळ नेतेपदी

राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या कट्टर विरोधकाकडे काँग्रेसनं विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी दिली आहे.

  • Share this:

मुंबई, विवेक कुलकर्णी, 14 जून : काँग्रेसचे माजी आमदार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे – पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या वाटेवर असलेल्या राधाकृष्ण विखे – पाटील यांना काँग्रेसनं आव्हान उभं केलं आहे. कारण, विखे – पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, विजय वडेट्टीवार यांची विधानसभा गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय, बसराज पाटील यांच्याकडे काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत होते. पण, त्यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेसनं नवीन चेहऱ्यांना देखील संधी दिली आहे. प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर यांची देखील प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, नसीम खान यांच्या खांद्यावर विधानसभा उपगट नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व पदांची नियुक्ती करताना काँग्रेसनं जातींचा समतोल देखील साधला आहे.

विखे - पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित

लोकसभा निवडणुकीमध्ये नगरची जागा मुलगा डॉ. सुजय विखे - पाटील यांना न मिळाल्यानं राधाकृष्ण विखे - पाटील नाराज होते. डॉ. सुजय विखे - पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते विजयी देखील झाले. लोकसभा निवडणुकीदरम्यान राधाकृष्ण विखे - पाटील हे आघाडीच्या प्रचारापासून देखील लांब होते.

दरम्यान, आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विखे - पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. लवकरच राधाकृष्ण विखे - पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


Loading...

बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानूष मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 12:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...