News18 Lokmat

राधाकृष्ण विखे-पाटलांचा आज भाजप प्रवेश? PM मोदींच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष

राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबुली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 10:34 AM IST

राधाकृष्ण विखे-पाटलांचा आज भाजप प्रवेश? PM मोदींच्या सभेकडे सगळ्यांचं लक्ष

अहमदनगर, 12 एप्रिल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी(12 एप्रिल) अहमदनगरला जाहीर सभा होणार आहे. युतीचे उमेदवार डॅा. सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येथे सभा घेणार आहेत. याच सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सगळ्यांचं या सभेकडे लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही नांदेडमध्ये पहिली प्रचारसभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करू नका, असं  आवाहन ते जनतेला करणार आहेत. अशाप्रकारे राज्यात ते राज्यात एकूण 10 सभा घेणार आहेत.

विजयसिंह मोहिते पाटीलही करणार भाजप प्रवेश

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश निश्चित झाल्याची चर्चा आहे. 17 एप्रिलला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नगरमध्ये भाजप Vsराष्ट्रवादी

Loading...

सुजय पाटलांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत अहमदनगर मतदारसंघात थेट राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

काँग्रेसच्या दुर्दशेबद्दल काय म्हणाले.. विखे पाटील

राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं, अशी कबुली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षात काय सुरू आहे याचा विचार पक्षातल्याच नेत्यांनी केला पाहिजे. सुजयने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे. त्याने पूर्ण जबाबदारीने तो निर्णय घेतला आहे. गेली तीन वर्ष तो या भागात काम करतो आहे. राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर आघाडीला झटका बसला नसता.

काँग्रेससाठी ही मोठी नामुष्की

राधाकृष्ण विखे पाटील हे गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं दिसून येत आहे. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी बोलूनही दाखवली आहे. राधाकृष्ण विखे यांचे सुपुत्र सुजय विखे यांना दक्षिण नगर मतदारसंघातून आघाडीने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. आता राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. ही बाब  म्हणजे काँग्रेससाठी मोठी नामुष्की असणार आहे. निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेतेपदावर असणाऱ्या व्यक्तीनेच पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांपर्यंत चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे.


VIDEO: रावसाहेब दानवेंचा विश्वास जिंकणारा 'शेतकरी अजेंडा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...