पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करू नये, राधाकृष्ण विखेंचा टोला

दुष्काळाची दाहकता बघता सरकारकडून जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त मदत सरकार करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2019 07:54 PM IST

पृथ्वीराज चव्हाणांनी माझी काळजी करू नये, राधाकृष्ण विखेंचा टोला

लोणी 23 जून : गृहनिर्माण मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं त्यांच्या लोणी या मुळगावी समर्थकांकडुन जंगी स्वागत करण्यात आलं. विखे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच दर्शन घेतलं. कॅबिनेटमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच लोणीत आले होते त्यामुळे समर्थकांमध्ये उत्साह होता. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तर देत काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनावरही टीका केली.

विखे पाटील म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी काळजी सोडावी, ज्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती झाली त्याची काळजी करावी. ते मुख्यमंत्री असताना राज्यात 82 वरून 42 जागा काँग्रेसच्या आल्या. माझ्या विरोधात याचिका न्यायालयात असल्याने खटल्यांवर भाष्य करणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, माझ्यावर भाजपने विश्वास व्यक्त करत कॅबिनेट मंत्रिपद दिलं. पंतप्रधान, पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी जो विश्वास दाखवला त्यास पात्र राहाण्याचा प्रयत्न राहील.आम्ही विरोधात असताना माहितीच्या आधारे काम करण्यास सांगत होतो त्यापेक्षा चांगलं काम सरकार करतंय. दुष्काळाची दाहकता बघता  सरकारकडून जी अपेक्षा आहे त्यापेक्षा जास्त मदत सरकार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आघाडीचाच मुख्यमंत्री - मुंडे

'विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजपचा किंवा शिवसेनेचा नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा मुख्यमंत्री होणार,' असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन कलगीतुरा रंगत आहे. याबाबत भाष्य करताना धनंजय मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे.

Loading...

मुंबईतील राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर चौफेर टीका केली. 'भाजपच्या कालच्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता. हे विस्मरण कसं झालं?शिवाजी महाराज स्मारकाची अजून एक वीटही रचली गेली नाही. आता शिवशाही सरकार आणू म्हणतात. पण भाजपने त्यांचा अपमान केला आहे,' असं म्हणत शिवस्मारकावरून धनंजय मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...