S M L

छगन भुजबळांच्या शेजारची कोठडी खाली आहे,चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला इशारा

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या महामेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आरोप करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची हिंमत होतेच कशी? असा सवाल त्यांनी केला.

Ajay Kautikwar | Updated On: Apr 6, 2018 04:30 PM IST

छगन भुजबळांच्या शेजारची कोठडी खाली आहे,चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला इशारा

मुंबई,ता.06 एप्रिल : सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या महामेळाव्यात राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर आरोप करण्याची राष्ट्रवादीच्या नेत्यांची हिंमत होतेच कशी? तुरूंगात असलेल्या छगन भुजबळांच्या शेजारच्या कोठड्या अजुन रिकाम्या आहेत हे हल्लाबोल करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटील यांनी केला.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातल्या 16 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याविरूध्द कोर्टात मानहानीचा खटला दाखल करू असंही त्यांनी सांगितलं. जे केलं त्याचं फळ हे मिळणारच आहे. थोडा उशीर होईल पण ते मिळणारच आहे. लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये जावं लागलं,सलमानही जलमध्ये गेला असा सूचक इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादीचा हल्लाबोल यात्रा ही गल्लाभरू यात्रा आहे, दुसऱ्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्याआधी स्वत:कडे बघा असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 6, 2018 04:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close