पुरंदरमध्ये चार बिबट्यांचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 15 मेंढ्यांचा मृत्यू, 50 बेपत्ता

पुरंदरमध्ये चार बिबट्यांचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, 15 मेंढ्यांचा मृत्यू, 50 बेपत्ता

प्रशासनाने या घटनेस कारणीभूत असणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी हा पिंजरा काढण्यास सांगितलं त्या लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करावी

  • Share this:

08 मे : पुरंदर तालुक्यातील वस्तीवरील चार बिबट्यांनी  300 मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात 15 मेंढ्यांचा मृत्यू झालाय. तर 50 मेंढ्या बेपत्ता आहे.

पुरंदर तालुक्यातील दिवे घाटा नजीक झेंडेवाडी येथील वळण वस्ती येथे रात्री दीड वाजल्यापासून चार बिबट्यांनी नामदेव तुकाराम कोकरे आणि बाबू रामभाऊ कोकरे यांच्या पालावर हल्ला केला. वाघरेतील 300 शेळ्या मेंढ्यावर बिबट्यांनी झडप घातली घाबरलेल्या शेळ्या मेंढ्यांनी वाघर तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत सुमारे 15 मेंढ्याचा बिबट्यांनी जीव घेतला. इतर मेंढ्या इकडे तिकडे पळून गेल्या. आज सकाळपर्यंत मेंढपाळ मेंढ्या शोधत होते.  सुमारे ५० मेंढ्या बेपत्ता आहेत.

संतप्त मेंढपालांनी मनसेचे शेतकरी सेनाचे प्रदेशाध्यक्ष बाबा जाधवराव यांच्या नेतृत्वाखाली मेलेल्या मेंढ्या ट्रॅक्टरमध्ये घालून सासवड पोलीस ठाण्यात नेल्या. या परिसरात बिबट्याचा वावर आहे. हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहीत होते. स्थानिकांच्या मागणीनुसार, गेल्या 15 दिवसापूर्वी या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. पण तो लगेच काढून नेल्यानेच ही दुर्घटना घडली आहे.

प्रशासनाने या घटनेस कारणीभूत असणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी हा पिंजरा काढण्यास सांगितलं त्या लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाई करावी. आमचे नुकसान भरपाई ही द्यावी अशी मागणीही केली आहे.या मागणीसाठी सासवड पोलीस ठाण्यात मेंढपालांनी ठिय्या मांडला होता. पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन दिल्यानंतर मेंढपालांनी  तहसील कार्यालयाकडे मोर्चा वळवला.

जखमी आणि मेलेल्या मेंढ्यासह त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. लावलेला पिंजरा कोणाच्या सांगण्यावरून काढला त्याचे नाव सांगा तसंच मेंढपालांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी करीत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2018 06:49 PM IST

ताज्या बातम्या