पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 16, 2017 10:46 AM IST

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

16 मे : पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचा आज (मंगळवारी) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. ते 53 वर्षांचे होते.

सकाळी रेसकोर्सवर वॉकिंगला जात असताना 8च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना लगेच रुबी हॉल हाॅस्पिटल दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

नवनाथ कांबळे हे रिपाइंचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. दोन महिन्यांपूर्वीच ते पुणे शहराचे उपमहापौर बनले होते. दलित पँथरमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. 1997मध्ये ते सर्वप्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2002 मध्येही त्यांनी नगरसेवकपद भुषवलं. तसंच शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. रिपाइंच्या शहराध्यक्षपदावरही ते होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2017 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...